Press "Enter" to skip to content

माझी आई

माझी आई

आई असते देवाची देणगी
पाठीवर हात अन् विश्वासाचा घाट

प्रतिबिंबात तिच्या मी दिसते उठून
म्हणून स्वभाव तिचा आहे माझ्यात लपून

खूप सोसलेस दुःख तू
देताना मला जन्म
कधीच केले नाहीस
कोणतेही वाईट कर्म

होतीस तू प्रेमळ खूप बोलक्या स्वभावाची
म्हणून होतीस तू महिला सरपंच
तीन गावांची

खूप चांगले शिकवलेस मला
केलेस तू संस्कार
होतीसच तू अशी की
विसरू नाही शकणार

गावात मला बोलतात
उज्वलाची ‘लेक लाडकी’ आली
तू आम्हा सर्वांपासून
एवढ्या दूर का गेली?

होत्या तुझ्या खूप इच्छा
रंगवली होतीस स्वप्ने
तुझ्या आठवणीत आम्हा
येते खूप खूप रडणे

तुझ्या हातच्या जेवणाची
आठवण येते खूप
पण काय करणार
ताटात येईल ते खाते गपचूप

झोप लागत नाही
आम्हा दोघाना
मनातल्या मनात बोलत असतो
रात्र काही सरेना

ओरडायचीस मला
‘दियू अभ्यास कर’
मी पहात बसायचे
मोबाईल दिवसभर

सोडून मला गेलीस तू
वयाच्या पंधराव्या वर्षात
पुढे कसं जगू
तुझ्याविना या जगात

तुझ्यावर लिहिली आहे आज मी पहिली कविता
तू मात्र नाहीस ती ऐकायला
जिथे कोठे आहेस तेथून
विसरू नको शाब्बासकी द्यायला

कु. दिया दिनेश वारेकर, माणगाव

One Comment

  1. Tirtha kharade Tirtha kharade September 8, 2020

    God bless you Diya…

Leave a Reply to Tirtha kharade Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.