सुधागडाला बसतोय कोरोनाचा घट्ट विळखा ! नव्याने आढळले 15 कोरोना बाधित रुग्ण ; एकूण बाधित 261 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔷🔶
सुधागड तालुक्याला कोरोनाने जंगजंग पछाडले आहे. असंख्य उपाययोजना केल्या तरी कोरोना रुग्णसंख्या दर कमी होण्याचे नाव घेत नाही. सुधागड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस तालुक्याला कोरोनाचा विळखा अधिक घट्ट बसत चालला आहे. शनिवारी (दि.5)सायंकाळी उशिरा प्राप्त अहवालानुसार तालुक्यात तब्बल 15 कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आजवर निर्धास्त असलेला सुधागड तालुका आता चिंताग्रस्त झाला आहे.
सुधागड तालुक्यात आता कोरोनाचे 261 रुग्ण झाले असून आत्तापर्यंत कोरोनाचे 148 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि 99 जणांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्थरावर विविध उपाययोजना राबविल्या जात असून त्यांची अंमलबजावणी देखील प्रभावीपणे होताना दिसते. प्रशासन योग्य प्रकारे काम करत आहे. पालीत स्पेशल टास्क टीम निर्माण केली असून त्याद्वारे काम होत आहे.
नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी होत आहे. कुणी आजारी असल्यास जागरूकता दाखवीत त्वरित उपचार घ्यावेत, आजार अंगावर काढू नये. जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. नागरिकांनी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे, आणि शासन नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.
Be First to Comment