Press "Enter" to skip to content

गुगलने हटवली 6 धोकादायक ॲप : तुम्हीही करा त्वरित डिलीट

सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली 🔷🔶🔷🔶

गुगल प्ले स्टोअरने आता आणखी सहा धोकादायक अ‍ॅप्स हटवली आहेत. याआधीही युजरर्सची माहिती चोरी करणाऱ्या आणि सायबर हल्ला करणाऱ्या अ‍ॅप्सना गुगलने हटवलं होतं. आता हटवण्यात आलेली अ‍ॅप्स जोकर मेलवेअर व्हायरस असलेली होती. या अ‍ॅप्सना 2 लाखांहून अधिक जणांनी डाउनलोड केलं होतं. सायबर सिक्युरीटी फर्म Pradeo च्या रिपोर्टनुसार सहा अ‍ॅप्समध्ये कनविनियन्ट स्कॅनर 2, सेफ्टी अ‍ॅपलॉक, पुश मेसेजेस टेक्स्टिंग अँड एसएमएस, इमोजी वॉलपेपर, सेपरेट डॉक स्कॅनर आणि फिंगरटिप गेमबॉक्स यांचा समावेश आहे.

रिपोर्टमध्ये धोकादायक अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आल्याचं सांगितलं आहे. मात्र अद्याप ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये ही अ‍ॅप आहेत त्यांनी तात्काळ डिलिट करावीत असंही म्हटलं आहे.

जोकर मेलवेअर डिव्हाइसमध्ये आल्यानंतर युजर्सना माहिती न होता त्यांच्या फोनवर प्रीमियम सर्व्हिस सबस्क्राइब केली जाते. गुगल प्ले स्टोअरने 2017 पासून आतापर्यंत अशा 1700 अ‍ॅप्सना हटवलं आहे. मात्र तरीही हॅकर्सकडून पुन्हा पुन्हा वेगवेगळी अ‍ॅप तयार केली जातात.

गुगल प्ले स्टोअरने दिलेल्या माहितीनुसार हटवण्यात आलेली सहा अ‍ॅप कशासाठी वापरली जात होती याची माहिती घेऊ. Convenient Scanner 2 या अ‍ॅपचा वापर करून डॉक्युमेंट स्कॅन करणे किंवा इमेल, प्रिंट काढता येत होती. ऑफिस डाक्युमेंट किंवा महत्वाची कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी हे वापरलं जात होतं.

Safety AppLock यातून कोणत्याही अ‍ॅपला पॅटर्न किंवा पासवर्ड टाकून लॉक करता येत होतं. Push Message-Texting & SMS हे अ‍ॅप एसएमएस आणि मेसेजिंग अ‍ॅप होतं. ज्यामध्ये रिंगटोनपासून व्हायब्रेशन पॅटर्नपर्यंत सेटिंग बदलता येत होतं.

याशिवाय Emoji Wallpaper हे अ‍ॅपही गुगलने काढून टाकलं आहे. याचा वापर करून फोनचा बॅकग्राउंड फोटो बदलता येत होता. डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी वापरण्यात येणारं आणखी एक अ‍ॅप होतं. Separate Doc Scanner यातसुद्धा जोकर मेलवेअर आढळल्यानं गुगलने हटवलं आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.