Press "Enter" to skip to content

खोपोलीत डाॅक्टर आणि कर्मचा-यांना मारहाण : प्रसूती नंतर बाळंतीणीचा मृत्यू

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶


प्रसूती नंतर बाळंतीणीचा मृत्यूमुळे संतप्त नातेवाईकानी ङाॅक्टर तसेच इतर कर्मचा-यांना मारहाण केल्याची घटना खोपोलीत घङली आहे. ङाॅक्टरानी दिलेल्या तक्रारिनुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खालापूर तालुक्यातील लौजी गावात राहणारी महिलेला प्रसूतीसाठी लक्ष्मी नगर खोपोली येथील रूग्णालयात  31ऑगस्ट रोजी राञी दहाच्या सुमारास दाखल करण्यात आले होते.प्रसूतीनंतर महिलेला झटका आल्याने  उपचारा दरम्यान तीचा मृत्यू झाला .

या घटनेने संतप्त नातेवाईकानी ङाॅक्टर व रूग्णालयातील इतर कर्मचारी यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याची तसेच साहित्याचे देखील नुकसान केल्याची तक्रार फिर्यादि ङाॅक्टर यानी दिली आहे.

याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र वैद्यकिय सेवा संस्था हिंसाचार रोकणे आणि मालमत्ता नुकसान करणे अधिनियम 2010 चे 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई अमोल वळसंग हे करीत आहेत.

महिलेच्या नातेवाईकानी देखील ङाॅक्टर विरोधात तक्रार दिली असून पोलीसांनी घटनेची नोंद अकस्मात मृत्यू  अशी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.