Press "Enter" to skip to content

केअर पॉईंट हॉस्पिटल मधून कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचे पलायन


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷

उरण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाने भर दुपारी दिवसाढवळ्या पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे.

उरण येथील केअर पॉईंट हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यातील एक कोरोना पॉझिटीव्ह रुगणांनी हॉस्पिटल मधून पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

सदरची घटना काल दुपारी घडल्याचे उघड झाले आहे. याबाबतची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल केल्याची माहिती वैद्यकीय प्रमुख अधिकारी डॉ. राजेंद्र इटकर यांनी दिली. पळून गेलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हॉस्पिटलमधून दिवसाढवळ्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण पळून जाऊ शकतो तर तेथील सुरक्षा व्यवस्था काय करीत होती असा सवाल या निमित्ताने उपस्थित रहातो.

केअर पॉईंट हॉस्पिटलमधून कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण पळून गेल्याची घटना घडल्याने उरणच्या जनतेत भीतीचे सावट पसरले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.