सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १४ जण सापडले आहेत. १८ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर आज मयताचा आकडा मोठा आहे. एकूण ५ जण कोरोनाने मयत झाले आहेत.
आज एकूण पॉझिटीव्ह १४१५, , उपचार करून बरे झालेले ११५६, उपचार घेणारे १८९, मयत ७० असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज नवापाडा करंजा १, श्रेयस अपार्टमेंट द्रोणागिरी नोड १, म्हातवली १, वैभव लक्ष्मी सोसायटी १, दिघोडे १, विंधणे १, साई नगर करंजा १, धाकटी जुई १, जासई २, बोकडविरा १, गणेश नगर करंजा रोड १, धुतुम १, अक्षर सेकटर ए द्रोणागिरी १ असे एकूण १४ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. श्री समर्थ कृपा म्हातवली १, विंधणे १, चिरले १, महालक्ष्मी अपार्टमेंट उरण ३, कामठा उरण १, सीआयएसएफ १, जेएनपीटी १, जासई १, उरण १, बुरुड आळी २, बोरी नाका १, नेव्हल स्टेशन करंजा १, नवघर १, भेंडखळ १, श्री समर्थ कृपा कमळपार्क म्हातवली १ असे एकूण १८ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर साई नगर गजानन निवास १, धुतुम १, कोटनाका उरण १ व भेंडखळ २ असे एकूण ५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी जास्त होत आहे. आज १४ जण पॉझिटीव्ह सापडले. तर १८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. परंतु आज मयताचा आकडा ५ आल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.यामुळे जनतेने बेसावध न रहाता योग्य ती खबरदारी घ्यावी.
Be First to Comment