सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशिल सावंत 🔷🔶🔶🔷
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला असून ग्रामीण व शहरी भागात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात आजवर एकूण रुग्णसंख्या 27 हजार पार झाली आहे. आजपर्यंतच्या रुग्णसंख्येत एका दिवसात सर्वाधिक तब्बल 670 इतके रुग्ण आढळून आले आहेत. तर आजच्या एका दिवशी 13 रुग्णांची मृत म्हणून नोंद झाली आहे, तर 477 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
सद्यस्थितीत विद्यमान एकूण 3934 रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत. कोव्हिडं 19 मुळे आजवर 839 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे आजवर 23929 रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. आज नव्याने आढळलेल्या रुग्णात पनवेल मनपा 226, पनवेल ग्रामीण 81, उरण 31, खालापूर 30, कर्जत 21, पेण 29, अलिबाग 91, मुरुड 07,माणगाव 49, तळा 06, सुधागड 19,रोहा 53, श्रीवर्धन 07, म्हसळा 01,महाड 16, पोलादपूर 03 आदी रुग्णांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरो ना संसर्ग अधिकाधिक फैलावत असल्याने चिंता वाढली आहे, तर प्रशासनापुढे कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
Be First to Comment