सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ३१ जण सापडले आहेत. तर १४ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. आज रिपोर्ट नुसार कोणीही मयत नाही.
आज एकूण पॉझिटीव्ह १४०१, , उपचार करून बरे झालेले ११३८, उपचार घेणारे १९८, मयत ६५ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज जासई १, जेएनपीटी टाऊनशीप ५, नागाव १, करंजा १, नेव्हल करंजा स्टेशन १, बोरी १, करंजा रोड १, कोप्रोली १, सोनारी १, करंजा कोंढरीपाडा १, द्रोणागिरी नोड १, जसखार २, नवीन शेवा १, द्वारका नगर नागाव १, केगाव विनायक ३, चिरले १, भेंडखळ १, विंधणे २, बोरीनाका उरण १, कातकरवाडी विंधणे १, धुतुम १, चिरनेर १, वेश्वि १ असे एकूण ३१ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर बोकडविरा १, केगाव आवेडा १, वाणी आळी उरण १, चिरनेर २, द्रोणागिरी नोड १, भेंडखळ १, केगाव १, उरण १, गोवठणे १, सोनारी २, नवीन शेवा १, कुंभारवाडा शांतीविहार १ असे एकूण १४ जणांना उपचार करून सोडण्यात आले आहे.
गेले दोन दिवस पॉझिटीव्हचा आकडा कमी आला होता. मात्र काल अनंतचतुर्थीच्या गणपतीचे विसर्जन होऊन आज एकदम पॉझिटीव्हचा आकडा वाढत ३१ पॉझिटीव्ह सापडले आहेत. यामुळे उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसून पुन्हा वाढत चालला आहे. तसेच कोरोनाने मयत झालेल्यांची माहिती रिपोर्टमध्ये त्वरित येत नसल्याने जनतेत संभ्रमाचे वातावरण पसरत आहे. तरी मयत झालेल्यांची माहिती रिपोर्टमध्ये त्याच दिवशी मिळावी. उरणच्या जनतेत योग्य ती खबरदारी घेऊनच बाजारात खरेदी करावी अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Be First to Comment