कोरोनाला गमतीत घेऊ नका ! रुग्णसंख्या 200 पार 🔶🔷🔶🔷
सुधागडवासीयांच्या चिंतेत भर : प्रशासनापुढे कोरोनाला रोखण्याचे तगडे आव्हान 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🌟💠🌟💠
सुधागड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबरोबरच मृत्यदर देखील वाढत असल्याने सुधागड वासीयभीतीच्या सावटाखाली आहेत. सोमवारी (दि.31) तब्बल 14 तर मंगळवार दि.(1)रोजी 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून रुग्णसंख्या 200 पार झाली आहे.
मंगळवारी दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका 22 ते 23 दिवसांच्या लहान चिमुरडीचा समावेश आहे. तब्बल 12 दिवस तिने कोरोनाशी झुंज दिली. मात्र ही झुंज अपयशी ठरली. या चिमुरडीवर मुंबई येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशासनापुढे कोरोनाला रोखण्याचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. अशातच ही बाब प्रकर्षाने पुढे आले आहे की अनेकजण कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, कोरोना गमतीचा , चेष्टा मस्करीचा विषय नाही, कोरोना जीवघेणा असल्याने नागरिकांनी कोरोना काळात योग्य ती काळजी व खबरदारी घ्यावी असे मत तज्ञ डॉक्टर व्यक्त करीत आहेत.
सुधागड तालुक्यात आता कोरोनाचे 204 रुग्ण झाले असून आत्तापर्यंत कोरोनाचे 124 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि 68 जणांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत, याबरोबरच प्रशासन योग्य प्रकारे काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शासन अटी व नियमांचे तंतोतंत पालन करून खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.
Be First to Comment