Press "Enter" to skip to content

जाणून घ्या कडीपता आपल्या आयुष्यात किती गुणकारी आहे

सिटीबेल लाईव्ह /आरोग्य कट्टा

सामान्यत: कडीपत्त्याचा वापर दक्षिण प्रांतात जास्त केला जातो. परंतु भारतात आता सर्व प्रांतांत याचा वापर होऊ लागला आहे. असंख्य गुणांमूळे कडीपत्ता हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं सिध्द झालं आहे. पण जेवणात असलेला कडीपत्ता अनेकजण बाजूला काढून ठेवतात. कडीपत्ता चवीला थोडासा कडवट असतो. पण तुम्हाला माहीत नसेल की कढीपत्ता तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी किती फायदेशीर आहे. मग आज आम्ही तुम्हाला कडीपत्त्याच्या याच फायद्यांशी अवगत करून देणार आहोत.

☘️ कडीपत्त्यात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरीयल, अँटी-फंगल गुण आहेत. त्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्स येण्यापासून बचाव होतो.

☘️ कडीपत्त्यामुळे पदार्थांना चव येते. कढीपत्त्यामुळे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढते.

☘️ कडीपत्ता आयरन आणि फॉलिक अॅसिडचा स्रोत आहे. आयरनची कमतरता फक्त शरीरात आयरन नसल्यानं नाही तर शरीरामध्ये आयरन मुरत नसल्यामुळे होते. याव्यतिरीक्त फॉलिक अॅसिड आयरन शोषून घेण्यास मदत करते.

☘️ कढीपत्त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. ब्लडमधील इन्सुलिनला प्रभावित करुन ब्लड-शुगर लेवल कमी करते.

☘️ कडीपत्त्यामुळे पचनशक्ती वाढते आणि वेट लॉससाठी मदत होते. यासाठी जास्त वजन असलेल्या लोकांनी कढीपत्त्याचं सेवन नियमित करावं. रोज उपाशीपोटी कढीपत्ता खाल्लात तरी चालेल.

☘️ कढीपत्त्याच्या सेवनानं कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाला वाढवून हृदयासंबंधी रोग आणि एनथेरोक्लेरोसीसचे रक्षण करते.

☘️ तुम्हाला कफाचा त्रास असेल तर कडीपत्त्याच्या पावडरमध्ये एक चमचा मध मिसळून त्याचं चाटण तयार करा. रोज हे चाटण खाल्लं तर कफाच्या त्रासातून मुक्ती होईल.

☘️ यकृतासाठी देखील कडीपत्त्याचं सेवन करणं फायदेशीर आहे. यकृत निरोगी ठेवण्यासाठी कढीपत्त्याच्या ज्यूसमध्ये एक छोटा चमचा घरी बनवलेले तुप, साखर, कुटलेली मिरी टाकावी. हे मिश्रण काही वेळ गरम करावं.

☘️ केसांसाठी फायदेशीर
कढीपत्त्यामध्ये लोह क’आणि‘अ’ जीवनसत्त्व, तसंच आयोडिनचं भरपूर प्रमाण आहे. त्यामुळे रुक्ष आणि गळणाऱ्या केसांसाठी हे संजीवनी ठरू शकते.
गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचं नुकसान होतं. कडीपत्त्यात केसांना निरोगी ठेवणारी तत्त्वे आहेत. या पानांचा बारीक लेप बनवावा. मग तो लेप केसांच्या मुळाशी लावावा.
कढीपत्त्याची पानं खाल्ल्यानं केस काळे, लांब आणि घनदाट होतात. कोंड्याची समस्याही दूर होते.
वाळलेल्या कडीपत्त्याच्या पानांची पूड करून ती खोबरेल तेलात उकळून घ्यावी. तेल थंड झाल्यावर ते गाळून हवाबंद बाटलीत भरून ठेवावं. झोपण्यापूर्वी हे तेल लावून दुसऱ्या दिवशी नैसर्गिक शाम्पूनं केस धुवावेत.

☘️ कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनिटं तसेच ठेवा. नंतर शाम्पूने केस धुवा. हा उपाय नियमित केल्यास केस काळे आणि घनदाट होतील

नेहमी वाचा सिटी बेल लाईव्ह आरोग्य कट्टा : माहीती संकलन – अजय शिवकर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.