सिटी बेल लाइव्ह / मॉस्को :
अनेकांना झोपताना तोंड उघडं ठेवून झोपायची सवय असते. परंतु त्या सवयीचा काय परिणाम होईल याचा कधी विचार केला आहे का ? विचार केला नसेल तर त्याचे कारण रशियामधील या महिलेला विचारा. या महिलेने तोंड उघडे करून झोपले असता तिच्या तोंडाला बीळ समजून चार फूट लांब साप तिच्या तोंडातून शरीरामध्ये घुसला. जेव्हा त्या महिलेला त्यावेळी श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेव्हा ती महिला डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी त्या महिलेच्या तोंडामध्ये एक पाईप घालून त्या सापाला बाहेर काढले. आता तरी तुम्हाला समजलं असेल, तोंड उघडे ठेवून झोपणे किती भयान असू शकत.
रशिया येथील दागेस्तान भागातील लेवशी गावाची 11,500 लोकसंख्या आहे.हे गाव समुद्रसपाटीपासून 4,165 फूट उंचीवर आहे. त्या गावात राहणारी एक महिला तिच्या बागेत झोपली होती. त्यावेळी त्या महिलेचे तोंड उघडे होते. यावेळी एक चार फुटाचा लांब साप तिच्या तोंडातून आत शरीरामध्ये गेला. ती महिला काही हालचाल करेपर्यंत साप शरीरामध्ये पोहचलेला होता. त्यामुळे त्या महिलेची तब्येत वेगाने खालावत चालली होती. तिला श्वास घ्यायलासुद्धा खूप त्रास होत होता, त्यामुळे त्या महिलेला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
महिलेला तातडीने आपत्कालीनमध्ये घेऊन गेले आणि सामान्य भूल देण्यात आली. यानंतर डॉक्टरांनी महिलेच्या गळ्यामध्ये व्हिडिओ कॅमेरा आणि लहान लाईट ट्यूब घातली. जेणेकरून शरीरामध्ये साप किती आतमध्ये गेला आहे ते समजेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, डॉक्टरांनी त्याच नळ्यामधून सापांचा एक भाग पकडला आणि त्याला हळूहळू बाहेर काढायला सुरुवात केली.
सोशल मीडियावर हे प्रचंड व्हायरल होत आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित वैद्यकीय कर्मचारी तो साप काढतात आणि त्याची उंची पाहून मागे सरकतात. ती सद्यस्थिती पाहता त्यावेळी महिला वैद्यकीय कर्मचारीच्या चेहऱ्यावर भीती दिसून येते. त्यानंतर त्या सापाला वैद्यकीय बादलीमध्ये ठेवण्यात येते. परंतु हा साप जिवंत बाहेर आला की मेला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेपासून रशियाच्या डागेस्टन येथील प्रशासनाने लोकांना घराबाहेर झोपण्यास मनाई केली आहे. कारण यावेळी तेथे बरेच साप बाहेर येण्याचे प्रकार घडत आहेत.
Be First to Comment