Press "Enter" to skip to content

गुळाचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

सिटी बेल लाइव्ह / आरोग्य कट्टा 🔷🔶🔷🔶

गूळामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषकघटक असतात. त्यामुळे साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा पिणे चांगले असते. गुळाच्या चहाचे फायदे अनेक आहेत. विशेषतः हिवाळ्यात थंडीच्या दिवसात गुळाचा चहा पिणे लाभदायी असते. हिवाळ्यात गुळापासून बनलेला चहा पिल्याने थंडपणाची भावना कमी होते. चला तर मग जाणून घेऊ फायदे ….

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरतो. कारण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लोहाचे प्रमाण गुळामध्ये मुबलक असते.

गुळाचा चहा पिण्यामुळे शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषकघटक मिळतात. कारण गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी अनेक महत्वाची पोषकतत्वे असतात. यामानाने साखरेत कोणतेही पोषकघटक नसतात. त्यामुळे आरोग्याचा विचार करता गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरते.


गुळाचा चहा पिण्यामळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. त्यामुळे हाय ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्यांसाठी गुळाचा चहा पिणे उपयोगी ठरतो. गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.

गुळाचा चहा पिण्यामुळे दमा, खोकला, सर्दी यासारखे कफाचे विकार कमी होण्यास मदत होते.

गूळ घातलेला चहा पिण्यामुळे आलेला थकवा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे थकवा जाणवत असल्यास गुळाचा चहा प्या, तुम्हाला आराम मिळेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.