Press "Enter" to skip to content

ऐकावं ते भलतंच ! जन्माला आली जुळी मुलं पण वडील निघाले दोन

सिटी बेल लाइव्ह / संडे स्पेशल 🔷🔶🔷🔶

हि दुनिया फक्त गोल नाही तर चित्र विचित्र आहे आणि याचा पुरावा आपल्याला काही हैराण करणाऱ्या गोष्टींतून मिळतो. काही घटना तर अशा असतात कि जिथे माणसं विज्ञान आणि प्रेमात मिळालेल्या धोक्यापासून हैराण होतो. जुळ्या मुलांचे हे प्रकरण पाहून तुमच्या मनातही हेच येते ना कि गर्भात एका व्यक्तीचे दोन वीर्य जर एकसाथ गेले तरच जुळी मुले जन्माला येतात.

जर तुम्हीही हाच विचार करत असाल तर तुमच्या माहितीसाठी जुळी मुलं होण्यामागे फक्त हेच कारण नसते. चीन मध्ये एका जोडप्यासोबत विज्ञानाचे एक अनोखे रूप समोर आले आहे, ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे.

समोर आले जुळ्या मुलांचे दोन वडील

खरंतर चीन मध्ये जुळ्या मुलांचे एक वेगळेच प्रकरण समोर आलं आहे. एका चिनी व्यक्तीची पत्नी गरोदर होती आणि तिला जुळे होणार होते. जेव्हा तिला हॉस्पिटल मध्ये दाखल केले तेव्हा तिचा पती त्यांच्या येणाऱ्या बाळाची वाट बघू लागला. त्या महिलेने दोन स्वस्थ जुळ्या मुलांना जन्म दिला. जुळी मुलं होणे आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे, परंतु असे खूप कमी केसेस मध्ये होते. वडिलांनी मुलांच्या जन्माचा दाखला काढतेवेळी डॉक्टरांना त्यांची डी एन ए टेस्ट करायला सांगितली.

अशी समोर आली फसवणुकीची घटना

ज्या व्यक्तीसोबत हि घटना घडली त्याला खूप धक्का बसला आहे. त्याने सांगितले कि मला विश्वासच बसत नाही कि माझी पत्नी असे करू शकते. तिचे कोणा दुसऱ्यासोबतसुद्धा संबंध असू शकतात, यावर विश्वास नाही बसत आहे. डेंग यजूं ने च या मुलांची टेस्ट केली होती. त्यांनी सांगितले कि,अशी घटना १ करोड लोकांमध्ये एका बरोबरच होऊ शकते. त्याचबरोबर त्याने सांगितले कि हे कसे होते.

त्याचबरोबर एक्स्पर्ट ने सुद्धा सांगितले कि स्त्री जर एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत असेल तर याची शक्यता खूप वाढते. अशातच त्या महिलेसोबत हि हेच झाले आहे. तिने तिच्या पती व्यतिरिक्त दुसऱ्या पुरूषासोबत हि संबंध ठेवले ज्यामुळे तिच्यात दोन गर्भ राहिले आणि तिने जुळ्या मुलांना जन्म दिला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.