Press "Enter" to skip to content

चोरट्याला पण पारले बिस्किटची गोडी : सव्वापाच लाखाचा माल लंपास

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔶🔷

जळगाव येथील एजन्सीमध्ये पोहविण्यासाठी दिलेले पारले बिस्किटाचे 1140 बाॅक्स मध्येच लंपास झाल्याची घटना घङली असून जवळपास 5लाख 34हजार 888रूपयांचा माल चोरीला गेल्याची तक्रार  पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.खालापूरातील ङोणवत हद्दीत पारले बिस्किटचा कारखाना आहे.17ऑगस्ट रोजी आरोपी (अज्ञात,नाव गाव माहित नाही)याने स्वत: गाडी मालक व चालक असल्याचे भासवुन  गाडीमध्ये भरलेला पारले बिस्कीटचा माल जळगाव येथील एम पी एजन्सीजमध्ये न पाठविता मध्येच दुस-या गाडीत भरून लंपास केला.

याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपी आणि त्याच्या अन्य साथीदारा विरोधात भा.दं.वि.कलम  420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई अमोल  वळसंग हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.