सिटी बेल लाइव्ह / आरोग्य प्रतिनिधी 🔶🔷🔶🔷
लॉकडाउनच्या काळामध्ये सर्वात विपरीत परिणाम हा ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक व मानसिक स्थितीवर झाला असून भारतामध्ये अनेकांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. युरोपियन देशातील कोरोनासंक्रमीत जें नागरिक मृत्यू पावले आहेत त्यापैकी ९५ टक्के नागरिकांचे वय साठच्या पुढे होते. भारत ही मधुमेहाची राजधानी असून अनेक ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर आजारांची लागण झालेली आहे.
त्यामुळे लॉकडाउनच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी कुटुंबातील इतर सभासदांना तारेवरची कसरत करावी लागली. आता मिशन बिगिन अगेनची सुरुवात झाली असून अनेक नागरिक आपल्या नोकरी धंद्यावर हळूहळू रुजू होत आहेत, परंतु त्यासोबतच कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसल्यामुळे घरात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संक्रमणाची भीती वाटत आहे कारण ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी नियमित रक्तदाब तपासणे, रक्तातील साखरेची पातळी चेक करणे, शरीरातील ऑक्सिजनची मात्रा तपासणी अशा अनेक महत्वाच्या तपासण्या संपूर्ण दिवसात करावे लागते, हीच गरज ओळखून मुंबईतील आरोग्य क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या अपेक्स हॉस्पिटल समूहाने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी “अपेक्स कनेक्ट केयर” या डायबेटिक मोबाईल अँपची सुरुवात केली आहे.
हे मोबाईल अँप ज्येष्ठ नागरिकांसाठीच बनविले असून यामध्ये हे नागरिक आपल्या रोजच्या तपासण्यांची माहिती टाकू शकतात त्यासोबतच हे अँप औषधे घेण्यासाठी त्यांना नियमित वेळेला अलार्म देणार आहेत, या अँपद्वारे ते डॉक्टरांची नियमित सल्ला घेऊ शकतात तसेच घरपोच मेडिसिन सुविधा, नियमित चाचण्या करण्यासाठी त्यांच्या घरी येऊन रक्ताचे नमुने घेणे, फीजिशियन व आहारतज्ज्ञांचा व्हिडीओ चॅटद्वारे सल्ला व इतर अनेक आरोग्य विषयक सुविधा देण्यात आल्या आहेत.
अपेक्स कनेक्ट केयर हे मोबाईल अँप डाउनलोड केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुद्धा सुखकारक होणार आहे कारण प्रवास करताना कोणतेही मेडिकल रिपोर्ट जवळ बाळगण्याची गरज नसणार असून त्यांचे सर्व रिपोर्ट या अँपवर उपलब्ध असणार आहेत. या मोबाईल अँपमुळे घरातील ज्येष्ठ नागरिकांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना सहज उपलब्ध असणार असून अगदी अल्प दरामध्ये त्यांचे नातेवाईक आपल्या घरातील जेष्ठ नागरिकांची काळजी आपल्या कामाच्या ठिकाणी राहून घेऊ शकतात.






Be First to Comment