Press "Enter" to skip to content

कोरोनामुक्त उरणचा निर्धार करा : भूषण पाटील यांचे जनतेला आवाहन

कोरोना उरणमध्ये हळू हळू येतोय नियंत्रणात 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे) 🌟💠🌟💠

आपण बहुतेकजण दररोज पाचनंतर उरणमधील कोरोनाग्रस्तांचा तक्ता पाहतो. किती रुग्ण पॉझिटिव्ह झाले, किती रुग्ण बरे झालेत व किती लोकांचा दुर्दैवाने अंत झाला. हे आपण बघतो. गेल्या काही दिवसापासून बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. ही दिलासा देणारी गोष्ट आहे.असे मत व्यक्त करत कोरोना मुक्त उरण करण्याचा संकल्प सर्वांनी एकत्र येऊन करावा असे आवाहन JNPT चे विश्वस्त भूषण पाटील यांनी उरण मधील नागरिकांना केले आहे.

जगातील कोरोना महामारीचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, ज्या ठिकाणी बरे होणाऱ्यांची संख्या बाधित होणाऱ्या संख्येच्या 80 टक्केपेक्षा जास्त होते. तेथे उच्चांक गाठला असे समजतात. उरणमध्ये ही अवस्था आहे असे वाटते. हा आलेख कमी-कमी होत आहे. परंतु बेसावध न राहता जास्तीत-जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. चालू काळ मोठ्या सणांचा आहे. गणपती उत्सव, नवरात्री, दिवाळी हे मोठे सण येणार आहेत. यंदाच्या वर्षी नियोजन करून कुठल्याही प्रकारे मोठा जमाव होणार नाही. याची खबरदारी घेण्याची गरज आहे.असेही त्यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी संवाद साधत सांगितले.

“लक्ष्मण रेषेप्रमाणे लक्ष्मण वर्तुळ पाळा.”

आपल्या राहत्या घरातील नातेवाईकांना सोडून शक्यतो कोणालाही दोन मीटरच्या अंतरामध्ये येऊ न देण. व स्वतःही न जाणं. याचे काटेकोर पालन करा. आपण हाताचा वापर जास्त करतो. म्हणून वारंवार हात धुवा व सॅनिटायझर- मास्कचा वापर करा. या गोष्टीचे पालन केल्यास आपण उरण तालुका कोरोनामुक्त करू शकतो.

गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये मी अनेक कोरोना रुग्णांना जेएनपीटी व इतर रुग्णालयांमध्ये ऍडमिट करण्यास सहकार्य केले आहे. त्यातील बहुतांश सर्वच लोक बरे होऊन घरी परतले. कोरोना होऊ न देणे व झाल्यास उपचार घेऊन बरे होणे व खबरदारीचे उपाय काटेकोरपणे पाळल्यास आपण उरण कोरोनामुक्त करू शकतो. तसा निर्धार या गणेशोत्सवात करूया. श्रद्धाळू जनता गणपतीला विघ्नहर्ता मानते.

माझ्यासारखा माणूस डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कामगार व समाजसेवक यांना विघ्नहर्ता मानतो.सर्वांच्या सहकार्याने उरण कोरोनामुक्त होवो.हीच सदिच्छा असे मत JNPT विश्वस्त भुषण पाटील यांनी व्यक्त केले आहे.भूषण पाटील यांनी कोरोना काळात अनेक गोरगरीब लोकांना मदत केली आहे. ते अधून मधून सोशल मीडिया द्वारेही जनतेशी योग्य तो संवाद साधत असतात.

यावेळी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत त्यांनी कोरोना मुक्त उरणचा संकल्प करत तसे आवाहनही उरणकरांना केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.