सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ३० जण सापडले आहेत. १२ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर ३ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. गणेशोत्सवात तपासणी बंद असल्याने कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी येत होता. परंतु आज मात्र दोन दिवसांची भरपाई करीत कोरोना पॉझिटीव्हचा आकडा ३० पर्यंत पोहचला आहे. तर ३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे आता उद्या होणाऱ्या गौरी गणपती विसर्जनात जनतेने योग्य ती खबरदारी घ्यावी.
आज एकूण पॉझिटीव्ह १२९५, उपचार करून बरे झालेले १०६२, उपचार घेणारे १७१, मयत ६२ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज नागाव २, करंजा कोंढरी १, बुरुड आळी उरण २, चिरले १, शांती विहार कुंभारवाडा १, जासई १, नवीन शेवा १, जेएनपीटी टाऊनशीप २, सोनारी २, गोवठणे १, कस्टम हाऊस उरण १, एमएसईबी कॉलनी बोकडविरा १, नेव्हल स्टेशन करंजा १, केगाव १, भेंडखळ २, द्रोणागिरी १, चिरनेर २, वाणी आळी उरण १, श्री समर्थ कृपा हौ. सो. १, केगाव आवेडा १, बोकडविरा १, मोरा १, बोरी १, म्हातवली १ असे एकूण ३० जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. कृष्णा पॅलेस बाजारपेठ उरण २, नवघर १, भेंडखळ २, मोठे भोम १, आवरे १, धुतुम २, जेएनपीटी पोर्ट १, केगाव आवेडा २असे १२ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर द्वारका नगर म्हातवली १, बोरी १, मोरा १ असे ३ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ऐन गणेशोत्सव सणात वाढताना दिसत आहे.
आज गौरी पूजन झाल्याने उद्या गौरी गणपतींचे विसर्जन होणार आहे. यावेळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत सोशल डिस्टंटचा वापर करून विसर्जन कार्यक्रमात सहभागी व्हावे. अन्यथा उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.






Be First to Comment