सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहा (नंदकुमार मरवडे) 🔶🔷🔷🔶
रोहा तालुक्यातील खारी – काजुवाडी येथील सर्पमित्र उमेश काळे यांनी आरे बु.येथे गडद रंगाचे चट्टे-पट्टे असणाऱ्या अजगर सापाला सुरक्षितरित्या पकडून जीवदान दिले आहे.
आरे बुद्रुक येथील रहिवासी गणेश दळवी यांच्या गुरांच्या गोठ्या मध्ये अगदी अडचणीच्या ठिकाणी गडद रंगाचे चट्टे पट्टे वाला साडे नऊ फूट लांबीचे अजगर साप पकडले.
गणेश चे वडील रात्री गुरांच्या गोठया कडे गुरांना चारा घालण्या करिता गेले असता भले मोठाले गडद रंगाचे चट्टे पट्टे असणाऱ्या अजगर निदर्शनास आले असता त्यांनी त्यांचा मुलगा गणेश ला दाखविले त्याने त्वरित खारी – काजुवाडी येथील सर्पमित्र उमेश काळे यांना फोन केले क्षणाचाही विलंब न करता काही मिनिटांमध्ये मंगळवार रात्रौ १०:३० वाजताच्या सुमारास आरे बुद्रुक येथे घटनास्थळी धाव घेत मोठ्या शिताफीने अजगर व चतुराईने अजगर सारख्या अजस्त्र सापाला पकडून आणि दूर जंगलामध्ये सुखरूप सोडून जीवनदान दिले..
सर्पमित्र उमेश काळे यांनी तत्परता दाखवून त्वरित अजगर सापाला पकडून स्वतःच्या गणेश दळवी च्या वडिलांना दिलासा दिल्याने त्याचे माजी सरपंच सुधाकर शिंदे,श्रीधर अण्णा शिंदे ,सुरेश शिंदे आदी ग्रामस्थ मंडळीने त्याचे आभार मानून कौतुक केले आहे.
सर्पमित्र उमेश काळेला साप पकडण्यासाठी खुप ठिकाणी बोलावले जाते व क्षणाचाही विलंब न करता तोही साप पकडण्यासाठी त्वरीत जाऊन सापांना पकडून सुरक्षितरित्या,सुखरूप सोडून जीवदान देत आला आहे. त्याने आतापर्यंत जवळ जवळ दीडशेहून अधिक विषारी व बिनविषारी साप पकडून त्यांना जीवनदान दिले आहे.






Be First to Comment