सिटी बेल लाइव्ह / रायगड:-अमूलकुमार जैन 🔶🔷🔶🔷
बन्सीलाल बहेल ट्रस्ट मार्फत मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीला ऑक्सिजन मशीन देण्यातभेट देण्यात आली आहे.
बोर्ली ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार बन्सीलाल बहेल ट्रस्ट मार्फत बोर्ली गावासाठी ऑक्सिजन मशीन देण्यात आली मशीन मिळवून देण्यासाठी बोर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बोर्ली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सॅमसन सोगावकर(सन्नी) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
बोर्ली गावासाठी यावेळी बन्सीलाल बहेल ट्रस्ट मार्फत बोर्ली गावासाठी ऑक्सिजन मशीन भेट म्हणून मिळवून दिल्याबद्दल सन्नी सोगावकर यांचे बोर्ली उपसरपंच मतीन सौदागर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर लोकार्पण कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्यां मिसाळ, उपसरपंच मतीन सौदागर,, ग्रामसेवक पांडुरंग गाडेकर, सदस्य चेतन जावसेन, बोर्ली शाखाप्रमुख भारत मोती, जयवंत अंबाजी उपस्थित होते.






Be First to Comment