Press "Enter" to skip to content

कोरोना बद्दल शंका आणि त्याचे समाधानकारक निरसन उपक्रमाचे आयोजन

मोबाईल द्वारे माहिती देण्याचा प्रयत्न 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे ) 🌟💠🌟💠


उरण मेडिकल असोसिएशन आणि ब्रिथ ह्यूमॅनीटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मधील नागरिकांसाठी कोरोना रोगाबाबत समाजात असलेले गैरसमज, अंधश्रद्धा दूर करणारे व सत्य माहिती देण्याचा उपक्रम आयोजित केलेला आहे.

कोरोना काळात कोरोना महामारीबद्दल जनतेच्या मनात खुप प्रश्न निर्माण झालेले आहेत. अशा विविध प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी बालरोगतज्ञ व उरण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विकास मोरे हे जनतेची मदत करणार आहेत.कोरोना रोगाविषयी जनतेच्या मनात कोणताही प्रश्न असेल , कोणतीही शंका ,कोणतीही भीती निर्माण झाली असेल किंवा कोणतीही माहिती हवी असेल तर ते विचारण्याची संधी उरण करांना मिळणार आहे. ज्यामुळे कोरोना रोगाच्या काळात तुम्हाला व्यवहार करण्यास मदत होईल.

कोरोना रोगाविषयी प्रत्येक प्रश्नाचे स्वागत असून त्याचे योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न उरण मधील रोहन घरत ब्रिथ हुमनीटी फाउंडेशन मार्फत करणार आहेत. त्यासाठी व्हाट्स ऍप नंबर 9819391212 वर जनतेनी प्रश्न विचारावे असे आवाहन रोहन घरत यांनी केले आहे . डॉक्टर विकास मोरे यांच्या मार्गदर्शनाने जनतेला त्यांचे योग्य उत्तर देण्याचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती रोहन घरत यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.