Press "Enter" to skip to content

१ सप्टेंबर पासून रास्तधान्य दुकानदारानी संपावर जाण्याचा इशारा

ईपॉज मशीनवर ग्राहकांचे बायोमेट्रीक अंगठे ( थंब ) घेण्यास सक्ती जीव घेणारी 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / कळंबोली/ विकास पाटील  💠🌟💠🌟 

देशासह राज्यात कोरोनाने हाहाकार मांडला असताना रास्त धान्य दकानात धान्य वितरण करताना लाभार्थीना ईपाँज मशिनवर बायोमेट्रिक अंगठे घेण्याची सक्ती केली जाते त्यामुळे कोरोनाचा संसर्गाने  नागरिकांचे जीव धोक्यात येऊ शकतात तेव्हा बायोमेट्रिक अंगठे घेण्याची सक्ती केल्यास १ सप्टेंबर पासून रास्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने अध्यक्ष भरत पाटील यांनी  जिल्हाधिकारी रायगड यांना लेखी दिलेल्या निवेदनाने इशारा दिला आहे.    

जगतिक कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून रास्तधान्य दुकानदार युध्दपातळीवर सामान्य गोरगरीबांची सेवा करत आहेत. असा जीवघेण्या परिस्थितीत ईपॉज मशीनवर ग्राहकांचे बायोमेट्रीक अंगठे ( थंब ) घेण्यास सक्ती केली जात आहे तेव्हा १ सप्टेंबर २०२० पासून अन्नधान्य चलन भरणा व धान्य वितरण थांबवून १ सप्टेंबर २०२० पासून होणा या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.  

अशा राष्ट्रीय आपात्कालीन परिस्थितीत दुकानदारांनी संपावर जाणे सामान्य जनतेला परवडणारे नाही तरी सुध्दा नाईलाजाने सामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून जनहितार्थ निर्णय घेणे भाग पडत आहे . शासकीय नियमानुसार महसूल अधिकायांनी प्राधान्य व अंत्योदय लाभार्थी रेशनकार्ड धारकांच्या अदयावत यादया तयार करून दुकानदारांना धान्य वितरण करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या होत्या व आहेत त्या उपलब्ध लाभार्थी यादयानुसार आजपर्यंत विनातक्रार दुकानदारांनी रेशनकार्ड धारकांना धान्य वाटप केलेले आहे व यापुढे वितरण करण्यांची दुकानदारांची तयारी आहे जागतीक कोरोना महामारीमुळे शासनाने रेशन दुकानदारांचे अंगठे ( थंब)  घेवून लाभार्थी कार्डधारकांना धान्य वितरण करण्याचे आदेश यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले आहेत.  

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कार्डधारकांचे अंगठयाचे ठसे घेवून ईपॉज मशीनवर धान्य वितरण करण्यासाठी दुकानदारांना सक्ती करण्यात येत असून , दुकानदारांचा ग्राहकांचे बायोमेट्रीक अंगठे ( थंब ) घेण्यास सक्त विरोध आहे रायगड जिल्हयातील पनवेल तालुक्यात कोरोना महामारी संक्रमण रूग्णंची संख्या ११००० हजाराहून अधिक असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे.यामध्ये पनवेल तालुक्यातील काही दुकानदार कोरोना संक्रमित असून , दुकानदारांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही

देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार १७ मार्च २०२० पासून सर्व शासकीय , निम्नशासकीय तसेच दुकानात ई पाँज बायोमेट्रीक थंबचा वापर करण्यास मनाई करण्यात आलेली होती व आहे परंतु राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ई पॉज मशीनवर बायोमेट्रीक अंगठे ( थंब ) सक्ती करण्यांत येत आहे .

याबाबत शासन व प्रशासनाचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे . जागतीक कोरोना महामारी लक्षात घेवून तसेच सणासुदीच्या दिवसात पावतीद्वारे अथवा दुकानदारांच्या अंगठे ( थंब ) नुसार किंवा नॉमिनी मार्फत धान्याचे वितरण करण्याचे आदेश देण्यात यावेत.  ग्राहकांचे अंगठे ( थंब ) व्यतिरिक्त अन्य पध्दतीचा अवलंब करून धान्य वितरण करण्यास दुकानदारांची हरकत नाही परंतु ईपॉज मशीनवर ग्राहकांच्या बायोमेट्रीक अंगठे ( थंबची ) सक्ती केल्यास १ सप्टेंबर २०२० पासून चलन भरणा व धान्य वितरण थंबविणेत येणार आहे त्या अंतर्गत कार्डधारकांची तक्रार अथवा उपसमारी सारखे प्रसंग उद्भवल्यास शासन व प्रशासनाची जबाबदारी राहील असेही निवेदनात म्हटले आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.