सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔶🔷🔶🔷
पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असलेल्या माथेरान मध्ये विकास कामे पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.त्यातच येथील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा दस्तुरी या भागातील काळोखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अति चढावाच्या रस्त्यामुळे श्रमिक हातरीक्षा चालक आणि हातगाडीवर कामे करणाऱ्या कष्टक-यांची खूपच दमछाक होत असते याकामी काळोखीचा हा शंभर मीटरचा चढ एकाच लेव्हल मध्ये समांतर करावा जेणेकरून या चढावाच्या ठिकाणी या श्रमिकांची दमछाक होणार नाही. यासाठीनगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, हातरीक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांसह स्थानिकांनी एमएमआरडीएच्या अधिकारी वर्गाची भेट घेऊन सविस्तरपणे या विषयावर चर्चा करण्यात आली असून हा तीव्र चढणीचा भाग कमी करून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असे आश्वासन एमएमआरडीए च्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

दस्तुरी ते पांडे रोड पर्यंतच्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या मुख्य रस्त्यासाठी जवळपास ४६ कोटी रुपयांची तरतूद एमएमआरडीए च्या माध्यमातून करण्यात आली आहे.धुळविरहीत रस्त्याला हा एक उत्तम पर्याय ठरणार असून माथेरानच्या पर्यटनाला चालना देणारा आहे.दस्तुरी अमन लॉज रेल्वे स्टेशन पासून या महत्वपूर्ण कामास सुरुवात करण्यात आली असून या मार्गातील अत्यंत चढावाचा भाग असलेल्या काळोखी मधील चढण तशीच ठेऊन ठेकेदाराने काम पुढे नेले होते.त्यामुळे होत असलेल्या या पैशाचा अनाठायी खर्च केला जात होता.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम भविष्यात या दुर्गम भागात येणे खूपच कठीण बाब आहे त्यामुळे जर का ही मुख्य चढण कमी केली नाही तर हातरीक्षा आणि हातगाडी ओढणाऱ्या श्रमिकांना कामे करताना खूपच त्रासदायक बनणार होते.तर आगामी काळात ई रिक्षा सुध्दा माथेरान मध्ये धावणार असल्याने चढावाच्या ठिकाणी ई रिक्षा तग धरू शकत नाही.याकामी एमएमआरडीए च्या आयुक्तांना विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांनी दि.१९ ऑगस्ट रोजी पत्र देऊन चढ कमी करण्याबाबतीत मागणी केली होती. तर नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सुध्दा दि ६ ऑगस्ट रोजी आयुक्तांना याच बाबतीत पत्र व्यवहार केला होता.

त्यानुसार दि २४ ऑगस्ट रोजी एमएमआरडीए चे कार्यकारी अभियंता अरविंद धाबे,डेप्युटी इंजिनियर किशोर टेंबुरलीकर, कन्सल्टंस डायरेक्टर, जियो टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट, अँटी कन्सल्टंस आणि ठेकेदार आदीनी हजेरी लावली होती.
१० ऑगस्ट रोजी एमएमआरडीए चे आयुक्त आर.ए.राजीव यांची
तसेच कार्यकारी अभियंता अरविंद धाबे यांची भेट घेऊन त्यांना सखाराम तुकाराम पॉईंट आणि रेल्वे लाईनच्या मधील मातीची धूप होणाऱ्या भागास गेबियन वॉल बांधण्यात याव्यात या बाबतीत पत्र देण्यात आले आणि अस्तित्वात असलेली चढण अजून कशी कमी करता येईल याबाबतीतही सूचना करण्यात आल्या.त्यामुळे लवकरच ही महत्वपूर्ण कामे मार्गी लागतील.
प्रेरणा प्रसाद सावंत - नगराध्यक्षा माथेरान






Be First to Comment