खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला शोक 🌟💠🌟💠
सिटी बेल लाइव्ह / श्रीवर्धन / संतोष सापते 🔷🔶🔷🔶
श्रीवर्धन तालुक्यातील माजी सभापती अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले यांचे निधन झाले. त्यांची निधन वार्ता ऐकल्यानंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
आपल्या शोक संदेशात खासदार सुनील तटकरे यांनी अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला आहे. अंतुले यांची कार्यपद्धती कारकीर्द व मनमिळाऊ स्वभाव याविषयी सुनील तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुनील तटकरे यांनी सांगितले अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त समजले. मनाला अतीव दुःख व वेदना झाले आहेत. त्यांची शैक्षणिक सामाजिक व राजकीय कारकीर्द 40 ते 45 वर्षांची आहे. श्रीवर्धन मतदार संघाच्या विकासासाठी त्यांनी सदैव पुढाकार घेतला होता. बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेबांचे ते निकटवर्ती होते. माझे वडील कैलासवासी दत्ताजीराव तटकरे सभापती असताना ते श्रीवर्धनचे सभापती होते. तसेच मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून पदभार सांभाळला होता. त्यामुळे माझ्यासोबतच्या त्यांच्या राजकीय, सामाजिक प्रवास दीर्घ काळ राहिला असून सर्व धार्मिक नागरिकांसोबत तथा त्यांचा संवाद आपुलकीचा होता.
पुढे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असताना आपल्या मितभाषी स्वभावाने व विकासात्मक कामामुळे रायगड जिल्ह्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यात माझा खारीचा वाटा राहिला त्याबद्दल मला निश्चितच अभिमान आहे. अब्दुल सत्तार इस्माईल हे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व होते. त्यांची उणीव सदैव भासत राहील त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असताना माझ्या कुटुंबियांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.






Be First to Comment