सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) 🔶🔷🔷🔶
रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटकशी संलग्न) यांच्यावतीने रायगड जिल्ह्यात वेतन कपात करणारा शासन निर्णय रद्द करा या मागणीसाठी 28 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रव्यापी काम बंद आंदोलन रायगड जिल्ह्यात करण्यात येणार आहे. आज उरणमधील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उरण पंचायत समितीचे जितेंद्र चिर्लेकर यांच्याकडे निवेदन दिले.
ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात दि. 28 एप्रिल 2020 रोजीच्या शासन निर्णयामध्ये ग्रामपंचायतीची वसुली आणि उत्पन्नाची अट बंधनकारक केल्यामुळे त्याचप्रमाणे लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध अद्याप चालू असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्यांना वसुलीच्या प्रमाणातच 50 टक्के आणि 75 टक्के वेतन मिळणार आहे. म्हणजेच 10 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्राच्या उद्योग व उर्जा कामगार विभागाने किमान वेतनाचे दर पूर्ण निर्धारीत करुन ते परिमंडळ 3 मधील कर्मचार्यांना रु. 11 हजार 825 आणि परिमंडळ 3 मधील कर्मचार्यांंना 13 हजार 85 रु. मान्य केले असले तरी वरील शासन निर्णयामुळे त्याचा लाभ ग्रामपंचायत कर्मचार्यांना मिळणार नाही.
एका हाताने देण्याचे नाटक करायचे आणि दुसर्या हाताने हिसकावून घ्यायचे सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी संतप्त झाले आहेत. म्हणून 28 जुलैचा शासन निर्णय रद्द करुन शासनमान्य वेतन 100 टक्के शासनानेच अदा करणे आवश्यकत आहे.
याच प्रमुख मागणीसहीत अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आपण 10 जुलै रोजी महाराष्ट्रव्यापी आंदोलन केलेले आहे. आता पुन्हा याच मागण्यांसाठी दि. 28 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्रव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याचे निवेदन उरण संघटनेनी आज दिले आहे.






Be First to Comment