जेएसडब्लू स्टील कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने साहित्य भेट 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / रायगड / अमूलकुमार जैन 🌟💠🌟💠
मुरूड तालुक्यातील साळाव येथे असणारी जेएसडब्लू स्टील कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने कुंडलिका प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि साहित्य भेट देण्यात आले आहे.
साळाव येथे असणारी जेएसडब्लू स्टील कंपनीच्या निगमीत सामाजिक दायित्व(सीएसआर)विभागाद्वारे कंपनीच्या आसपास असणाऱ्या सहा ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या बावीस गावांच्या विकासासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम नियमित राबवित असते.यामध्ये सर्व गावांना शुद्ध पाणी पुरविणे, शिक्षणासाठी सहकार्य,विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी निशुल्क बससेवा,तांत्रिक शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण, पर्यावरण,सामाजिक व आर्थिक वाढीकरिता नियमितपणे कार्यक्रम राबविले जातात.
जेएसडब्लू स्टील कंपनीमार्फत सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य पार पाडले जातात. जेएसडब्लू स्टील कंपनीच्यासाळाव ते तळेखार विभागातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी व शेतकऱ्यांना लागणाऱ्या नवनवीन शेती अवजरेव यंत्र बियाणे योग्य दराने शेतकऱ्यांना मिळण्यासाठी जेएसडब्लू कंपनीच्या सीएसआर विभाग साळाव यांनी कुंडलिका कृषी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वळके येथील कार्यालयाचे उद्घाटन करीत त्याकरिता आवश्यक असणारे कार्यालयीन साहित्य भेट दिले.

या कार्यक्रमाला जेएसडब्लू कंपनीच्या साळाव व डोलवी सीएसआर विभागाचे प्रमुख विनायक दळवी,सीएसआर विभागाचे राजेश वानखेडे, साळाव येथील सीएसआर विभागाचे राम मोहिते,अपर्णा पाटील,राकेश चवरकर,संतोष पाटील,लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे सुधीर गजबे,अविनाश पाटील, मंगेश शेडगे, कुंडलिका कृषी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीलाधर काटकर यांनी केले त्यावेळी त्यांनी जेएसडब्लू फाउंडेशन,जेएसडब्लू स्टील कंपनी व सीएसआर साळाव विभागाचे कुंडलिका कृषी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आभार मानले.






Be First to Comment