स्वतः चिकण मातीचा बाप्पा बनवून अंगणात टपामध्ये केले विसर्जन..🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत ) 💠🌟💠🌟
पर्यावरण संवर्धनासाठी पालीतील धनंजय गद्रे गुरुजींनी खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरक व पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा केला. चिकण मातीपासून स्वतः गणेशमूर्ती बनवून तिचे विसर्जन घराच्या अंगणात टपाच्या पाण्यात केले. आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा एक वस्तुपाठ घालून दिला.
धनंजय गद्रे यांनी आपल्या परिसरातील चिकणमाती (लाल माती) गोळा करून स्वतःच्या हाताने गणरायाची मूर्ती घडविली. मूर्तीचा आकार देखील लहान बनविला. या मूर्तीला नैसर्गिक रंग दिले. बाप्पाची आरासही घरगुती पर्यावरण स्नेही वस्तूंचा वापर करुन बनविली.आणि स्वतः घडविलेल्या बाप्पाचे विसर्जन देखील आपल्या घराच्या समोर अंगणात पाण्याच्या टबामध्ये केले. यावेळी घरातीलच मंडळी सोबत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अनोखे विसर्जन उपयुक्त देखील ठरले.
निसर्गाचे रक्षण व्हावे यासाठी पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनविली. तसेच पर्यावरण संवर्धन व कोरोनाच्या काळात गर्दी होऊ नये यासाठी विसर्जनाचा एक अभिनव प्रकार केला. वसुंधरा व पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने असे पर्यावरण पूरक सण साजरे करणे आवश्यक आहे.
धनंजय गद्रे गुरुजी,
पर्यावरण पूरक गणेशोत्सव पुरस्कर्ते







Be First to Comment