सुधागड वनविभागाची कारवाई : दोन वाहने व मुद्देमाल जप्त 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 💠🌟💠🌟
सुधागड तालुक्यात सातत्याने दुर्मिळ वन्यजीव प्राण्यांची तस्करी व अवैद्य वृक्षतोडीसारखे गुन्हे समोर येतात. सुधागड तालुक्यातील वनक्षेत्रातील मौजे कानसळ गावानजीक पाली खोपोली मार्गावर खैर वृक्षांची वाहनातून अवैद्य वाहतूक केल्याप्रकरणी पाली वनविभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील दोन वाहने व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आले असल्याची माहिती सुधागड वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी दिली.

उपवनसंरक्षक अलिबाग व सहाय्य क वनरक्षक अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली समीर शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधागड यांच्यामार्फ़त वनपाल खांडपोली बी. जी. दळवी , वनरक्षक आर. पी .टिके, एस. डी. शिंदे, एस. ए .डोंगरे, आर. जे. राक्षे, बी. एम. हाटकर, एस. व्ही. पोले, एम. एस पाटील, जे. एम. गायकवाड आदींच्या साहाय्याने सदरची कारवाई करण्यात आली. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, सुधागड तालुक्यातील वनक्षेत्रातील मौजे कानसळ गावानजीक पाली खोपोली मार्गावर गस्त करीत असताना पहाटेच्या सुमारास पीक क्रमांक एम एच 06 BG 2884 मधून खैर जातीचे झाडाचे तुकडे ट्रक क्रमांक एम एच 17/C 7787वाहनात भरत असल्याचे दिसून आले.
सदरचे खैर लाकडांबाबत वाहनचालक नरेंद्र वारंगे, रा.तोरण पाडा यांना विचारणा केली असता सदरचे झाडांचे तुकडे ट्रक चालक निजाम हुसेन पटई रा.चिपळूण यांच्या सांगण्यावरून महागाव येथून आणल्याचे सांगितले. सदर खैर लाकडांबाबत वनविभागाच्या वाहतूक परवाण्या विषयीं विचारणा केल्यास परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे खांडपोली रौ.गु.र. सी 7/2020 -21 दि.24/08/2020 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यात पीक अप वाहन चालक नरेंद्र वारंगे, रा.तोरणपाडा ता. सुधागड, ट्रक चालक निजाम पटई, रा.चिपळूण, बळीराम हिलम, रा. भोप्याची वाडी, ता. सुधागड, बाळू पवार, रा. भोप्याची वाडी, ता. सुधागड, नारायण घोगरकर, रा. भोप्याची वाडी, ता. सुधागड, रमेश हिलम, रा. भोप्याची वाडी, ता. सुधागड, आदींना अटक करण्यात आली आहे. प्रकरणी आरोपींचे जवाब नोंदवून पुढील तपास सुधागड वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






Be First to Comment