सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
बेकायदेशीरपणे दुचाकीवरून देशी दारू वाहतूक करताना खालापूर पोलीसांनी रवी अरविंद गुरव आणि सुगंधा विश्वास शिदोरे (रा. वावोशी ता. खालापूर )या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकङून 10हजार 348 रूपये किंमतीची देशी संञा दारू व दुचाकी जप्त केली आहे.
खब-यांनी पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार पोलीसांनी सापळा रचला. दुपारी पावणेचारच्या सुमारास रवी आणि सुंगधा गोरठण वावोशी रस्त्याने दुचाकीवरून जात असताना पोलीसांनी थांबवून त्यांची झङती घेतली.त्यावेळी बेकायदेशीरपणे देशी दारू वाहतुक करत आढळून आले.
याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे दारूबंदी अधिनियम, 1949, चे कलम 65(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक मनोज सिरतार हे करीत आहेत.






Be First to Comment