सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ११ जण सापडले आहेत. १५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर २ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
आज एकूण पॉझिटीव्ह १२६५, उपचार करून बरे झालेले १०५०, उपचार घेणारे १५६, मयत ५९ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज विंधणे १, नवघर १, एनएडी करंजा १, नागाव २, भेंडखळ २, माया विहार सोसा. बोरी १, बोरी पावभाट १, गॅलक्सी अपार्टमेंट १, कोटनाका १ असे एकूण ११ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. भवरा झोपडपट्टी १, नागाव १, मुळेखंड तेलीपाडा १, श्री गणेश सोसायटी नागाव १, नवापाडा करंजा १, डोंगरी १, जेएनपीटी सीआयएसएफ १, आवरे १, भेंडखळ २, सोनारी १, श्रीयोग नगर करंजा १, खोपटे १, बापूशेठवाडी उरण १, करंजा १ असे एकूण १५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर भेंडखळ जेएनपीटी हाउस नंबर १ गावदेवी मंदिराजवळ १ व नागाव १ असे २ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
गणेशोत्सवात दोन दिवस कोरोना तपासणी बंद असल्याने पॉझिटीव्हचा आकडा कमी येत होता. परंतु आता पुन्हा कोरोना पॉझिटीव्हचा आकडा वाढू लागला आहे. आता हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






Be First to Comment