नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔷🔶🔶🔷
कर्जत नगरपरिषदे मधील नागरिकांना मालमत्ता करामध्ये 2% टक्के शास्ती सूट मिळावी यासाठी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले अजून त्याव्दारे मागणी केली आहे.
कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा 26 जून 2020 रोजी झाली होती या सभेत या विषयावर चर्चा होऊन दंड रक्कम सूट देण्याबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद नसल्याने शासनास सूट देण्याबाबत विनंती करण्याचा ठराव पारित करण्यात आला होता.
त्यानुसार कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती पत्र देऊन कर्जत नगर परिषद हद्दीतील मालमत्ता नियमानुसार कर आकारणी करण्यात येते. सन 2019 2020 या कालावधीमध्ये मालमत्ता कराची बिले बजावण्यात आली होती सदर बिल बजावल्या पासून 90 दिवसांमध्ये मालमत्ता कर भरणा न केल्यास महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 150 अ (1) नुसार 2% टक्के प्रति महिना व्याज शास्ती म्हणून आकारण्यात येते.
कोव्हीड-19 विषाणूचा प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर रोगाचा प्रादुर्भाव टाळणे शासनाने वेळोवेळी लागू केलेले लॉक डाऊन याकारणाने मालमत्ता धारकांचे उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने तसेच बहुतांश मालमताधारक यांनी गुंतवणूक म्हणून कर्जत शहरात मालमत्ता संपादित केलेल्या आहेत सदर मालमत्ता धारकांना लोक डाऊन मुळे येऊन मालमत्ता कर भरता आले नसल्याने त्यांना सुद्धा शास्ती म्हणून आकारण्यात येणारे व्याज आकारू नये याकरिता विनंती करण्यात आली आहे.
वरील बाबींचा विचार करता कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपाय योजना कामी जाहीर केलेल्या लॉकडॉन मुळे नागरिकांच्या घटलेल्या उत्पन्नाचा विचार होऊन मालमत्ता करात लागणारी दोन टक्के शासकीय सूट मिळण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत अशी विनंती नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पत्रात केली आहे.






Be First to Comment