3 लाख 70 हजार 760 रुपयांचा माल जप्त 🌟💠🌟💠
सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔷🔶🔷🔶
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहीवली परिसरात असलेल्या होलसेल किराणा मालाचे व्यापारी यांचे गोडावून फोडून अज्ञात चोरट्यांनी बिस्किटाचे बॉक्स व किराणा मालाचे सामानाची चोरी केली होती,या दोन चोरट्यांना पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले असून पोलिसांनी त्यांच्याजवळील 3 लाख 70 हजार 750 रुपयाचा माल जप्त केला आहे.
नगर परिषद हद्दीतील दहिवली येथे मार्केट यार्ड मध्ये मानस डिस्ट्रीब्यूटर्स नावाचे किराणा मालाचे गोडाऊन आहे,10 ऑगस्ट 2020 रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गोडाऊन फोडून गोडाऊन मधील बिस्किटांचे बॉक्स व इतर किराणा वस्तू चोरून नेल्या होत्या.
गोडाऊन चे मालक संदीप पाटील यांनी कर्जत पोलिस ठाण्यांमध्ये याबाबत तक्रार दाखल केली होती कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 150/2020 भा.ड.वि. क 457, 380,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस नाईक सचिन नरुटे, पोलीस शिपाई भुषण चौधरी, पोलीस शिपाई रुपेश म्हात्रे,पोलीस शिपाई अशरुबा बेंद्रे यांनी तपास सुरू केला.
गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संदीप आबा निगुडसे व गुरुदास बसुराज पाटील राहणार कर्जत यांना पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या प्रकरणी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी दोघांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता दोघांनी गुन्हा कबूल केला.
सदर आरोपींकडून बिस्किटाचे बॉक्स व रोख रक्कम मिळून असा 3 लाख 70 हजार 750 रुपयाचा माल जप्त केला तसेच त्यांनी गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.






Be First to Comment