व्यवस्थापकांचे मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांना आश्वासन 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔷🔶
मराठी माणूस आणि मराठी भाषेचा अजेंडा घेऊन मनसे पक्ष कायम आंदोलन करताना दिसते. सुधागड मनसे देखील या मुद्यावर आता आक्रमक झाली आहे. पालीतील बँक ऑफ इंडिया शाखेतील माहिती फलक हे फक्त हिंदी व इंग्रजी भाषेत आहेत. त्यामुळे ताबडतोब मराठी भाषेत देखील हे माहिती फलक करावे अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांनी बँक व्यवस्थापकांकडे केली.

दोन दिवसांत बँकेतील फलक मराठीत करतो असे आश्वासन बँक व्यवस्थापक राजेंद्रप्रसाद गुप्ता यांनी सुनील साठे यांना दिले. सुधागड तालुक्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयात मराठीत माहिती फलक असावेत असा आग्रह मनसेने धरल्याने अनेकांनी इंग्लिश फलक हटाव मोहीम हाती घेतल्याचे दिसते.






Be First to Comment