दिशा केंद्राच्या मार्फत मदत वाटपाची केली होती मागणी 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔶🔷🔶🔷
कोरोना विषाणू च्या सावटात लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मूळे हातावर पोट असलेल्या कष्टकरी, आदिवासीची होणारी ससेहोलपट थाबंवण्यासाठी सरकारी आणी गैरसरकारी संस्था, संघटना पूढे आल्या होत्या, या सर्वानी मदत दिल्याने अनेक आदिवासी, कष्टकरी कुटुंबांना आधार मिळाला आहे.आता कर्जतच्या प्रांत वैशाली परदेशी- ठाकूर यांच्या सहकार्याने आदिवासी बाधंवाना धान्यवाटप करण्यात आले.
सध्या कर्जत तालुक्यात शेतीची कामे संपली आणी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक आदिवासी कुटुंबे ही घरीच बसून असल्यामुळे धान्याची चणचण भासत आहे अशाच कातकरी कुटूंबानी दिशा केंद्र या सामाजिक संस्थेच्या माध्यामातून कर्जतच्या प्रांत वैशाली परदेशी- ठाकूर यांच्याकडे धान्याची मदत मागीतली होती. या मागणीची दखल घेत गरज असलेल्या दिडशे आदिवासी कातकरी कुटुंबांना गव्हाचे पिठ पाचकिलो पाच किलो, डाळ दोन किलो, तेल एक कीलो, एक किलो साखर, साबण, मिठ आदि वस्तूंचा यामध्ये समावेश असलेले किटचे वाटप करण्यात आले.
तालूक्यातील शिरसे ग्रामपंचायत हद्दीतील तमनाथ कातकरवाडी येथे शंभर तर बिड ग्रामपंचायत मधिल बिड कातकरवाडी, खाणीचीवाडी येथुल पन्नास आदिवासी कातकरी कुटुंबांना किट वाटप करण्यात आले
कर्जत खालापुरच्या प्रांत वैशाली परदेशी-ठाकूर, नायब तहसीलदार पूरूषोतम थोरात, मंडळ आधिकारी मिलींद ति-हेकर, प्रातं कार्यालयातील आधंळे, दिशा केंद्राचे कार्यकर्ते अशोक जंगले, वैष्णवी दभडे आदिच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
सरकरी रेशनवर फक्त तांदूळ आणी गहू मिळतात. डाळ, तेल, मसला, साखर यांची आमच्या लोकांना गरज होती ते देण्याची मागणी आम्ही दिशा केंद्राकडे केली होती. त्या मागणी मूळे आज आम्हाला प्रातं मँडम कडून ही मदत मिळाली त्याचे आम्ही आभार मानतो.
सिताताई पवार (तमनाथ )
ख़डू वाघमारे (बिड कातकरवाडी)
स्थानिक आदिवासी नागरीक






Be First to Comment