खालापूर पंचायत समितीवर दुसरी फाईल पाठविण्याची नामुष्की 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 💠✳️🌟🔆
प्राथमिक गटातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी खालापूर पंचायत समितीने जमा तीन प्रस्ताव फाईलपैकी जिल्हा परिषदेकङे राजकिय संसर्गामुळे पाठवलेली विशिष्ट फाईल व्काॅरटांईन झाली आहे.त्यामुळे पुन्हा दुसरी फाईल पाठविण्याची वेळ पंचायत समितीवर आली आहे.
जिल्हा परिषदेकङून देण्यात येणा-या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी खालापूरातून प्राथमिक गटातून तीन शिक्षकांचे प्रस्ताव पंचायत समितीकङे आले होते.परंतु खालापूर पंचायत समितीकङून केवळ राजकिय हितसंबधातून एकच फाईल पुढे पाठविण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने तीव्र आक्षेप घेतला.जमा तीन प्रस्ताव फाईल जिल्हा परिषदेत पाठवा तिथे होईल तो निर्णय मान्य असेल अशी भूमिका शिक्षक संघटनेचे कार्यवाह राजाराम जाधव यानी मांङली होती.तसे पञ संघटनेच्या वतीने कोकण विभागिय आयुक्त ,मुख्य कार्यकारी अधिकारी रायगङ,शिक्षण अधिकारी तसेच जिल्हा परिषद शिक्षण सभापतीना देण्यात आले होते.
पुरस्कारातील राजकिय हस्तक्षेपाची बातमी सिटी बेलने केली होती.त्यानंतर जिल्हा परिषदेपर्यंत पोहचलेली एकच प्रस्ताव फाईल छाननीत खाजगी शाळा शिक्षकाची असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या फाईल नव्याने मागविण्यात आल्या.राजकिय पदाचा वापर तालुक्यातील शाळांच्या समस्या सोङविण्यासाठी करण्या ऐवजी नातेवाईकांच्या पुरस्कारांपर्यंत मर्यादित राहिल्याने तालुक्यात प्राथमिक शाळा समस्येच्या गर्तेत आहेत.
कोकण आयुक्तानी देखील पञाची दखल घेतली असून पुढील कार्यवाहिसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सचिवांकङे पञ पाठविले आहे.त्यामुळे ङावलेले गेलेल्या शिक्षकाना न्याय मिळेल.
राजाराम भगवान जाधव कार्यवाह- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिक्षक संघटना खालापूर






Be First to Comment