सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे.(नंदकुमार मरवडे) 🔷🔶🔶🔷
गौरी-गणपतीच्या सणामध्ये गौरी पूजनासाठी आवश्यक असणाऱ्या सुप आणि सुपल्यांना सध्या मोठी मागणी वाढली असून ठिकठिकाणी सुप विक्रेते सुप-सुपल्या विकत असल्याचे दिसून येत आहेत.
एरव्ही घरगुती कामामध्ये व शेतीच्या कामामध्ये सुपांचा वापर केला जात असल्याने ग्रामीण जीवनामध्ये सुपांना अनन्यसाधारण महत्व आहे. तर गौरी-गणपतीच्या सणाला सवाष्ण महिला,बालिका यांना गौरी पुजनासाठी सुपाची आवश्यकता असते.तर या दिवसात नववधू आपल्या माहेरहून विविध फळे,सुका मेवा,पेढे,बर्फी,लाडू तसेच अन्य पदार्थांनी सुपं भरून सासरच्या घरी तसेच सासरकडील आप्तस्वकीय यांना भेट मँहणून देण्याची परंपरागत प्रथा आहे.अर्थातच सुपांचीच आवश्यकता असल्याने सध्या बाजारात सुप विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
गौरींना पुजनासाठी सुप-सुपल्यांची आवश्यकता असल्याने लाँकडाऊन कालावधीत बंद असलेल्या सुप विक्रेते व्यावसायिक व विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत.कोरोना महामारीमुळे अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिक यांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होतो.सध्या बाजारात काही जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झालेली दिसत आहे. तर सुपांच्या किंमतीही १५०/- ते २००/-रू.पर्यंत पोहोचल्या आहेत.व खास वेणीची डिझाईन असलेले सुप हे २००/- ते २५०/-रू.पर्यंत विकले जात असल्याचे दिसून येत आहे.






Be First to Comment