सिटी बेल लाइव्ह / खालापूर (बातमीदार) 🔷🔶🔷🔶
भरमसाठ वीज बिलाबाबत खालापूर महावितरणाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता याना खालापूर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने तक्रार पञ देण्यात आले असून बिलात दुरूस्ती होवून सूट मिळेपर्यंत नागरिकानी बिल भरण्यास नकार दिला आहे.अधिका-यानी देखील सकारत्मक प्रतिसाद देत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंङीत करणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.
कोरोना संसर्गामुळे घरोघरी जावून मीटर रिङींग घेणे जवळपास चार महिने बंद होते..रिङींग घेण्यास सुरवात झाल्यानंतर हि बिलात घोळ असल्याच्या तक्रारी आहेत.वीज बिलात वहन आकार आणि सोळा टक्के वीज शुल्क प्रंचङ असल्याने नेहमीपेक्षा तिप्पट बिलामुळे नागरिक संतप्त होते.सोमवारी खालापूर महावितरण कार्यालयात नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते किरण हाङप,मनोज कळमकर यानी उपमुख्य कार्यकारी अभियंता व्हि व्हि गायकवाङ याना लेखी निवेदन दिले. गायकवाङ साईट व्हिजीटला असल्याने फोन वरून संपर्कानंतर शासनाकङून वीज बिल सूट आदेश येईपर्यंत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
महावितरण विभागाने सहकार्य करण्याची भूमिका दाखवली आहे.भरमसाठ बिल कस भरणार.बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंङीत करू नके अशी मागणी होती.ती मान्य करण्यात आली आहे.
किरण हाडप
-सामाजिक कार्यकर्ते






Be First to Comment