सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) 🔶🔷🔶🔷
वरवठणे-नागोठणे ऐतिहासिक पुलावर तीन ते चार दिवस झालेल्या पुरामुळे केरकचरा साठल्यामुळे जाणाऱ्या – येणाऱ्या जनतेला त्याचा खूप त्रास होत होता तसेच गणेशोत्सव देखील सुरवात झाल्यामुळे अनेक नागरिकांचे पुलावरून ये जा सुरु झाली असल्यामुळे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष वरवठणे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन शेकापचे रोहा तालुका युवक चिटणीस विशाल पाटील, मुकेश म्हात्रे, निखील म्हात्रे, ऋतीक माळी, नयन पाटील, अतिश सारले, अनिकेत म्हात्रे या गावातील होतकरू तरुणांना सोबत घेऊन वारवठणे ऐतेहासिक पुलाची साफसफाई करून आपली सामाजिक बांधिलकी निभावली.
याबाबत किशोरभाई म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वरवठणे ऐतिहासिक पुलाचे जतन करणे शासनाचे कर्तव्य आहे. परंतु शासनाच्या बांधकाम खात्याचे या पुलाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परंतु या पुलाचे नव्याने बांधकाम होई पर्यंत मी शांत बसणार नाही असे शेवटी किशोरभाई म्हात्रे यांनी सांगितले.






Be First to Comment