सिटी बेल लाइव्ह / राजेश बाष्टे / अलिबाग प्रतिनिधी 🔷🔶🔶🔷
“सावतामाळी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबाग” ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्या बद्दल धनंजय प्रभाकर म्हात्रे ( सामाजिक कार्यकर्ते ), कुरुळ – अलिबाग यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमेश नाईक, उपाध्यक्ष श्रीकांत नाईक, सौ. पूजा पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. धनंजय प्रभाकर म्हात्रे हे मागील १४ ते १५ वर्षे सामाजिक कामात कार्यरत आहेत. लोककडाऊन मध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत तसेच आत्तापर्यंत राजकारण व पक्षपात विरहित असे आपले सामाजिक कार्य चालू ठेवलेले आहे.
नैसर्गिक आपत्ती, सामाजिक समस्या अथवा लोक हिताचे उपक्रमांमध्ये त्यांचा आपले एक सामाजिक कर्तव्य म्हणून सहभाग नेहमी असतोच.
त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल घेऊन “सावतामाळी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबाग” जी शाबासकी दिली आहे. त्यामुळे नक्कीच पुढील काळात अजून चांगल्या प्रकारे सामाजिक योगदान देता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले व सर्वांचे मनापासून आभार मानले..






Be First to Comment