Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यात 2184 दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन

कोरोना विषाणूचे सावट असल्यामुळे कृत्रिम तलावांमध्ये बाप्पाचे विसर्जन 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔶🔷🔷🔶


दरवर्षी आपण गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो मात्र या वर्षी या सणाला कोरोना चे सावट आहे. कोरोना विषाणूचा प्रादर्भाव असल्याने यावेळी शासनाने हा सण साजरा करताना काही नियमाचे पालन करण्याच्या आदेश दिले होते. शासनाच्या आदेशनानुसार गणपती सण साजरा करण्यात आला.

आज दि.23 ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील 2184 दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणेत बाप्पाला निरोप देण्यात आला.

कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1237 खाजगी गणपती तर सार्वजनिक गणपती 3 असे एकूण 1240 गणपती.
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 812 खाजगी गणपती तर सार्वजनिक गणपती 6 असे 818 गणपती. माथेरान पोलीस स्टेशनच्या हद्दीत खाजगी गणपती 124 तर सार्वजनिक गणपती 2 असे एकूण 126 गणपती.

कर्जत तालुक्यात येणाऱ्या कर्जत पोलीस ठाणे, नेरळ पोलीस ठाणे आणि माथेरान पोलीस ठाणे या तीन पोलीस ठाण्याच्या मध्ये खाजगी म्हणजे घरगुती 2173 गणपती तर सार्वजनिक 11 गणपती असे 2184 गणेरायचे आज विसर्जन करण्यात आले.

शासनाच्या नियमानुसार कर्जत नगर परिषद हद्दीमध्ये गणपती विसर्जनासाठी 10 कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आपल्या घरगुती गणेरायचे जुन्या नगरपरिषद कार्यालयाजवळ बनविण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये बाप्पाचे विसर्जन केले.

यावर्षीचे गणपती विसर्जन माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेश क्रमांक 407 नुसार आणि करोना महामारी गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यात कामी पारंपारिक पद्धतीने नदीत न करता नगरपरिषदेने विविध ठिकाणी नगरपरिषद क्षेत्रात 10 कृत्रिम तलाव तयार केले होते हे सर्व तलाव सजविण्यात आले होते, त्या परिसरातील नागरिकांनी त्याच ठिकाणी गणेशाचे विसर्जन करावे असे आव्हान कर्जत नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी नगरपरिषद हद्दीत फिरून कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भेटी दिल्या व नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.