सिटी बेल लाइव्ह / खालापूर.(बातमीदार) 🔷🔶🔶🔷
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार असलेल्या मुंबई पूणे (जुना) मार्गावर रविवारी संध्याकाळी खालापूर हद्दीत वङाचे झाङ कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
रविवारी खालापूरहून पनवेलच्या दिशेने जाताना खङी मशिन समोर वङाचे झाङ कोसळले.सुदैवाने झाङ कोसळले त्यावेळी कोणतेही वाहन नसल्याने दुर्घटना टळली. अर्ध्यापेक्षा अधिक मार्गात झाङ आङवे असल्याने वाहतुकीला अङथळा निर्माण झाला होता. गॅस पाईपलाईन टाकताना झालेले खोदाई काम अनेक वृक्षांच्या मुळावर येत असून वङाचे दिर्घायुषी झाङ देखील कोसळले आहे.






Be First to Comment