सिटी बेल लाइव्ह / सुनील ठाकूर / उरण 🔶🔷🔶🔷
चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड चे गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप या उपक्रमातील 2 आठवड्यात सलग 3 कार्यक्रम
बाल संस्कार केंद्र उरण (गरीब झोपडपट्टी तील शाळा ) मध्ये इतक्या मुसळधार पावसात चाईल्ड केअर सामाजिक संस्था चे कार्य लाख मोलाचे लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून मुलांना पाट्या, पेन्सिल, खाऊ आणी मास वाटप करण्यात आले.
या प्रसंगी बाल संस्कार केंद्राचे अध्यक्ष -श्री नरेश म्हात्रे व उपाध्यक्ष -श्री दिलीप तांडेल उपस्थित होते. तसेच चाईल्ड केअर सामाजिक संस्थे कडून संस्थापक, अध्यक्ष – विकास कडू, उपाध्यक्ष – मनोज ठाकूर, उपाध्यक्ष -ह्रितिक पाटील, मुख्य सचिव -अभिषेक माळी, हे उपस्थित होते. या वेळी बाल संस्कार केंद्र चे अध्यक्ष नरेश म्हात्रे यांनी चाईल्ड केअर सामाजिक संस्था चे गरीब मुलांना मदत करणाऱ्या या उप क्रम चे प्रमुख संस्थापक, अध्यक्ष – विकास कडू चे खास कौतुक करून संस्थेला भेट वस्तू भेट म्हणून दिले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाल संस्कार केंद्र चे उपाध्यक्ष -दिलीप तांडेल यांनी केले






Be First to Comment