कोंकणी बोली कवी संमेलनात रायगड भूषण कवी प्रा. एल. बी. पाटील यांनी उमटविला आगरी बोलीचा ठसा…! 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) ✳️💠🌟🔆
“कोंकणी राष्ट्र मान्यता दीस ” म्हणजेच कोंकणी राष्ट्र मान्यता दिवस या निमित्त कोकणच्या अर्थ प्रकाशनकडून ‘कोंकणी विविध बोली’ हे ऑनलाइन कवी संमेलन नुकतेच संपन्न झाले. या संमेलनात आगरी बोलीला स्थान देण्यात आले होते. आगरी भाषा श्रवणास वेगळेपण व गोडवा जाणवावा अशी आहे.
यावेळी उरण येथील रायगड भूषण कवी प्रा. एल. बी. पाटील आगरी भाषेचे महत्व संगितले. त्यांच्या ” मना इवानान जावाचा हाय ” आगरी बोली कवितेने संमेलनात रंगत आणली. संमेलनात कोंकणी बोलणा-या 15 कवींनी आपल्या कवितांमधून विविध बोलींचा विविध ढंग आणि वैशिष्ट्य दाखवून दिले. उत्तर कोकणातून आगरी बोलीचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी रायगडभूषण प्रा. एल बी पाटील यांनी आगरी बोलीतील बहारदार कविता सादर करून आगरी बोलीचा ठसा उमटविला.
फेसबूक व युटुबवर झालेल्या या अनोख्या कवी संमेलनाचे आयोजन डॉ. भूषण भावे, गौरीश वेर्णेकर, मनोज कामत यांनी केले होते.






Be First to Comment