13 रुग्णांनी केली मात : 166 रुग्णांवर उपचार सुरू 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / महाड / रघुनाथ भागवत 🔆🌟💠✳️
गेली पाच महिने कोरोना विषाणूने सगळीकडे हैदोस घातले असून आता केंद्र सरकारने अनलॉक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मात्र कोरोनाचे महासंकट काहीकेल्या थांबायला तयार नाही. सरकार आणि त्यांची यंत्रणा मोठ्या कसोशीने प्रयत्न करून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी झटत आहे, तरी देखील रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महाड तालुक्यात दररोज महाड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत. आज 23 ऑगस्ट रोजी महाड तालुक्यात कोरोना विषाणू बाधित नव्या 27 रुग्णांची भर पडली असून 13 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर दुर्दैवाने 2 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
महाड तहसीलदार कार्यालयातुन उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आज रविवार 23 ऑगस्ट रोजी 27 कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये जुनी पेठ महाड येथील 57 वर्षीय महिला, देशमुख मोहल्ला महाड येथील 38 वर्षीय महिला, विन्हेरे येथील 78 वर्षीय पुरुष, गवळ आळी महाड येथील 53 वर्षीय पुरुष, महाड येथील 58 वर्षीय पुरुष, बिरवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, महाड येथिल 53 वर्षीय पुरुष, भिवनगर बिरवाडी येथील 78 वर्षीय महिला, विनती कॉलोनी महाड येथील 82 वर्षीय पुरुष, सावित्री इन्क्लिव्ह महाड येथील 56 वर्षीय पुरुष, नक्षत्र बिल्डिंग बिरवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट नवेनगर महाड येथील 44 वर्षीय महिला, असनपोई बौद्धवाडी बिरवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, अप्पर तुडील येथील 41 वर्षीय पुरुष, बिरवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, खैरे बिरवाडी येथील 42 वर्षीय महिला, भावे येथील 52 वर्षीय पुरुष, वरंध कुंभार कोंड येथील 34 वर्षीय पुरुष, सिटी गार्डन बि.महाड येथील 60 वर्षीय महिला, विन्हेरे येथील 38 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, काळीज महाड येथील 49 वर्षीय पुरुष, अपेक्षा झेरॉक्स महाड येथील 36 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 5 वर्षीय मुलगी व कोटेश्वरी तळे महाड येथील 27 वर्षीय पुरुष इत्यादी आढळले आहेत.
कोरोनाच्या महामारीतून आज 13 जणांनी मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र दुर्दैवाने विनती कॉलोनी महाड येथील 82 वर्षीय पुरुष, काकर तावू शिंदेआळी येथील 47 वर्षीय पुरुष या दोघांनी कोरोना महामारीत आपले प्राण गमावले आहेत.
महाड तालुक्यात आज पर्यंत 862 कोरोना बाधित रुग्ण सापडले तर 656 रुग्ण बरे होऊन त्यांना त्यांना डीचार्ज देण्यात आला आहे, मात्र दुर्दैवाने तालुक्यातील आजपर्यंत 40 जणांनी प्राण गमावले, तर 166 कोरोना बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.






Be First to Comment