सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔷🔶🔷🔶
माथेरान काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष संतोष लखन यांची रायगड जिल्हा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र त्यांना अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जयसिंह कछवाह,राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टांक यांनी सुपूर्द केले आहे.
संतोष लखन यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कार्य काळात सुध्दा चतुर्थ श्रेणी कामगारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता तर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडताना कामगारांच्या मूलभूत गरजा आणि त्यांना नेहमीच भेडसावत असलेल्या अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. ज्या ज्या वेळी सामंजस्यपणाने कामगारांना न्याय मिळाला नाही त्यावेळेस उपोषणाच्या हत्याराचा वापर करून अनेक प्रश्न तडीस नेण्याची महत्वपुर्ण कामगिरी त्यांनी बजावली आहे.
या त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन या राज्यव्यापी संघटनेने संतोष लखन यांची रायगड जिल्हा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.त्यामुळे यापुढेही चतुर्थ श्रेणीच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते तत्पर असून गावातील असंख्य प्रश्न सुध्दा आपल्या संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे संतोष लखन यांनी सांगितले आहे.लखन यांची निवड झाल्यामुळे सफाई कामगारांसह गावातील नागरिकांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.






Be First to Comment