Press "Enter" to skip to content

श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध 🔷🔶🔶🔷

उच्च दर्जाची आरोग्यसेवा हे कर्तव्य….. अदिती तटकरे 💠✳️💠✳️

सिटी बेल लाइव्ह / श्रीवर्धन-प्रतिनिधी/ संतोष सापते 🔶🔷🔶🔷

माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला उच्च दर्जाची आरोग्यसेवा प्रदान करणे हे आमदार या नात्याने माझे कर्तव्य आहे. उपजिल्हा रुग्णालयात आमदार निधीचा उपयोग करून सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी रुग्णवाहिका लोकार्पण करताना आनंद होत आहे असे अदिती तटकरे यांनी सांगितले.

श्रीवर्धन तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम व सदृढ करण्याच्या दृष्टिकोनातून मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन तालुक्यातील जनतेला उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी विविध आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा उपकरणाची उपलब्धता करण्यात आपल्याला यश आलेला आहे. डिजिटल एक्स-रे मशीन, कोरोना च्या पार्श्वभूमीवर पर्याप्त ऑक्‍सिजनचा साठा, व्हेंटिलेटर या सर्व बाबी आजमितीस रुग्णालयात उपलब्ध आहेत.

तालुक्यातील रुग्णांची कोणत्या स्वरूपाचे हेळसांड होऊ नये त्यांना उच्च दर्जाचे रुग्णसेवा मिळावी या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. असे तटकरे यांनी सांगितले.

उपजिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारच्या रुग्णवाहिका आज उपलब्ध आहेत. रायगड मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व रूग्णालयात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सर्वसामान्य जनतेला निशुल्क आरोग्य सेवा प्रदान करून त्यांच्या आरोग्यविषयक सर्व बाबीसाठी मी आमदार या नात्याने सदैव अग्रणी आहे. 2010 पासून श्रीवर्धन मधील जनतेच्या आरोग्यासाठी सुनील तटकरे साहेब त्यांनी वारंवार पाठपुरवठा केलेला आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन कुटीर रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रूपांतर करण्यात आले.

श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्ती आज उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा घेत आहे. येणाऱ्या काळामध्ये जनताभिमुख कामाची परंपरा सदैव अखंडित राहणार आहे. तीन जूनला झालेल्या चक्रीवादळाने सर्वसामान्य व्यक्ती त्रासला आहे.त्यात कोरोना सारख्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा कठीण प्रसंगी सर्वसामान्य व्यक्तीच्या प्रत्येक अडीअडचणीत सहभागी होणे हे माझं दायित्व आहे. जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार या नात्याने मी कटिबद्ध आहे असे अदिती तटकरे यांनी सांगितले.

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी एक दिवसाचा श्रीवर्धन दौरा केला. उपजिल्हा रुग्णालयातील सर्व सोयी-सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच जलसंपदा विभागातील मयत रवींद्र वेळासकर यांच्या मरणोत्तर त्यांचा मुलगा राहुल वेळासकर यांच्याकडे प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.

रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक सतीश माने, प्रांतअधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, डॉक्टर मधुकर ढवळे, नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे व रुग्णालयाचे सर्व कर्मचारी आणि श्रीवर्धन मधील नागरिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.