पनवेल महानगरपालिका व सिडको तर्फे व्यवस्था : प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांचे प्रयत्न 🔷🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / खांदा कॉलनी 💠✳️💠✳️💠
खांदा कॉलनी व आसपासच्या परिसरातील सर्व गणेश भक्तांसाठी कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमानुसार या वर्षी श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी पनवेल महानगरपालिका तर्फे कृत्रिम तलावांची तसेच सिडकोच्या वतीने मूर्ती ठेवण्यासाठी टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.
महानगरपालिका आणि सिडकोचे कर्मचारी आपल्या सेवेसाठी तैनात ठेवण्यात आले आहेत.
सर्व गणेश भक्तांनी विसर्जन आरती घरीच करून गर्दी टाळण्यासाठी फक्त दोन किंवा तीन व्यक्तीनींच विसर्जन ठिकाणी जावे. तसेच श्रींची मूर्ती उपस्थित कर्मचाऱ्यांकडे द्यावी ते कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करतील. कृत्रिम तलावातील पाण्यात सोडीयम हायफोक्लोराईड मिसळले असल्याने मूर्तीचे निर्जंतुकीकरण होईल व तद्नंतर मूर्ती मुख्य तलावात विसर्जित करण्यात येतील अशी माहिती महानगरपालीकेतर्फे देण्यात आली आहे.
सर्व गणेश भक्तांनी विसर्जन स्थळी गर्दी न करता महानगरपालिका व सिडकोच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा ही नम्र विनंती.
संजय दिनकर भोपी
सभापती - प्रभाग समिती ब
पनवेल महानगरपालिका







Be First to Comment