सिटी बेल लाइव्ह / समिर बामुगडे /मुंबई ###
केंद्र शासनाने महिन्याभरापूर्वीच परवानगी दिलेली असल्याने
“पुनश्च हरि: ओम” अभियानांतर्गत प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून मंदिरे , देवस्थाने सुरु करुन त्यात मर्यादित संख्येने भजन- किर्तन, पूजा-अर्चना करण्याची परवानगी मिळावी याबाबत आज महामहिम राज्यपाल यांची भेट घेऊन विनंती करण्यात आली.
महाराष्ट्रातील अनेक आध्यात्मिक संघटनांच्या वतीने एक शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटले. यात भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, अ.भा. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, अ.भा.संन्यासी संप्रदायातर्फे स्वामी विश्वेश्वरानंद जी सहभागी होते. अखिल भारतीय संत समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद, जय बाबाजी भक्त परिवार, विरशैव लिंगायत संप्रदाय, आदि. अनेक प्रमुख संघटनांनी शिष्टमंडळामार्फत आपली निवेदने सादर केली.
Be First to Comment