रेणुका माऊली
रेणुके रेणुके तूच माझी माउली ग
सदैव आम्हा संकटातुनी तारिसी ग
कुलस्वामिनी आमुची तुला मी नित्य स्मरी
न सांगताही तुज कळे दुःख अंतरी
जगदंबे आशिर्वाद तुझा नित्य राहो शिरी
तांबूल , ओटी ठेविली तुझ्या चरणावरी
भक्ती माझी स्वीकारूनी रक्षिसी वरचेवरी
माहुर गडावरी तुझा असे नित्य वास
मम गृही तुझी कृपा राहो ही एक आस
नको बंधन स्मराया तुज कुठल्या वाराचे
चित्त सदैव असते चरणी तुझ्या या पामराचे
मूर्ती तुझी दिसता मन प्रसन्न होई
नकळत बळ माझ्यात सामावून जाई
तुझी थोरवी काय वर्णावा तुझा थाट
सर्वास दाविसी तू यशाची वाट
सुखदा तारे , खांदा कॉलनी






Be First to Comment