
बैलपोळा
श्रावणाच्या अमावस्येला,
बैलपोळा सण आला
घालू आंघोळ प्रेमानं ,
चला सजवू या बैलाला….
साथ देतो आयुष्याला,
खरा जन्माचा हा साथी
काळ्या आईच्या गर्भातून,
पिकवीतो माणिक मोती….
गोंडे झुंबर बांधून ,
सजवू रंगवु ही शिंगे
बांधू घुंगराच्या माळा,
शोभे सुंदर बाशिंगे….
कवड्या आरश्याच्या माळा,
अंगावर शोभे छान
झुल लावीली नक्षीची,
हलवी डौलाने हा मान…
बैल सजवून मिरवून,
काढती मिरवणूक
घरची लक्ष्मी पूजे जेव्हा ,
होतो तोही मग भावुक….
जगाच्या पोशिंद्याला,
पूजती एक वेळ
तुझ्या रे मुले आम्हा ,
घास मिळे दोन वेळ….
तुझे उपकार कधी ,
फिटे ना आयुष्याला
एक दिवसच नाही
रोज यावा बैलपोळा
अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४






Be First to Comment