श्रावणसर
सर सर श्रावणाची
पुलकित झाली काया
नभानेही पहा केली
कशी धरेवरी माया.
नभ करी शिडकावा
धरा हसते लाजते
सृजनाचे नवे बीज
तिच्या ओटीत रुजते.
रुजते ते बीज आणि
येई धरेला तजेला,
हिरव्या रंगाचा शालू
धरा नेसते नवेला.
नाना सुगंधी फुलांनी
ओटी भरण्या धरेची,
पहा पहा आली आली
सर सर श्रावणाची.
अपर्णा साठे, नवीन पनवेल






Be First to Comment